शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहर पोलिसांची अक्षय जाधव टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 12:20 IST

पोेलिसांनी यापुर्वी २५ जणांवर या कायद्याअंतर्गत कारवाई असून आतापर्यंत एकुण ३१ जणांवर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगेल्या आठ दिवसांत मोक्काअंतर्गत झालेली ही दुसरी कारवाई परप्रांतीय युवकासह सहाजणांचा समावेशसंबंधितांवर खुन,खुनाचा प्रयत्न,घरफोडी, कट रचणे, खंडणी आदी २४ गुन्हे दाखलआर्थिक प्राप्ती तसेच टोळीच्या वर्चस्वासाठी गुन्हे केल्याचे निष्पन्न

बारामती: बारामती शहर पोलिसांनी परिसरातील अक्षय जाधव टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.यामध्ये एका परप्रांतीयासह सहा जणांचा समावेश आहे. संबंधितांवर खुन,खुनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायदा कलम, घरफोडी,जबरी चोरी, कट रचणे,खंडणी आदी २४ गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठ दिवसांत मोक्काअंतर्गत झालेली ही दुसरी कारवाई आहे. यापुर्वी २५ जणांवर पोेलिसांनी या कायद्याअंतर्गत कारवाई असून आतापर्यंत एकुण ३१ जणांवर कारवाई झाली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पत्रकारांशी बोलताना याप्रकरणी माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर्वी फिर्यादी आकाश उर्फ मोज्या हनुमंत वाघमोडे (वय २४,धंदा  व्यापार,रा.वडकेनगर,आमराई ,बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.वाघमोडे हे शहरातील पानगल्लीमध्ये सफरचंद विक्रीचा व्यवसाय करतात.नेहमीप्रमाणे सफरचंद विकुन झाल्यावर पॅकींग करीत होते. यावेळी दोन दुचाकीवर १)अक्षय उर्फ आकाश उर्फ भोºया बापुराव जाधव (वय २३, रा.मळद,ता.बारामती),२)पोक्या उर्फ  शंकर प्रकाश आडके ,३) शिवराम बबन आडके उर्फ गुड्डया उर्फ करण वर्मा (वय २७,मुळ रा.राजगी,जि.नालंदा, राज्य बिहार,सध्या रा.मळद,ता. बारामती)४) सनी रोहिदास भंडलगर (वय२६,रा.मळद,ता. बारामती),५) पोक्या आडकेचा साथीदार (फरारी),६) पोक्या आडकेचा साथीदार (फरारी) यांनी चार हजार रुपये हफ्ता दे म्हणुन फियार्दीच्या गळ्याला चाकु लावला. सफरचंद विक्रीचे ४७०० रुपये,अर्धा तोळे वजनाची १२५०० रुपये किंमतीची अंगठी,८६० रुपये किंमतीचे घड्याळ हिसकावुन घेतल्याचा प्रकार घडला.याबाबत फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. या ६ आरोपींवर विविध गंभीर २४ गुन्हे दाखल आहेत.त्यानुसार या गुन्ह्यातील आरोपी अक्षय उर्फ आकाश याने आर्थिक प्राप्ती तसेच टोळीच्या वर्चस्वासाठी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी अपर पोलीस अधिक्षक डॉ संदीप पखाले यांनी कोल्हापुर परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रकरण पाठविले  होते . त्याला मंजुरी देण्यात आली आहे.अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर,पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ करत आहेत.———————————बारामती परिसरातील ३१ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाईगेल्या दहा दिवसांत बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन एकुण ३१ जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटीलयांनी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहिर केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.———————————————

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक