शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आचोळे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; एका टोळीच्या 7 सदस्यांना केले तडीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 16:34 IST

पोलिसांनी तडीपारीची कारवाई करून गुन्हेगारांबद्दल सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर केली आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहरातील आचोळे आणि तुळींज पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा, दहशत निर्माण करणे, पैश्यासाठी अपहरण करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, अवैध शस्त्रांचा वापर करुन धमकावणे, गर्दी मारामारी करणाऱ्या एका टोळीच्या सात सदस्यांना सोमवारी आचोळे पोलिसांनी पाच जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. एकाच दिवशी सात जणांना तडीपार केल्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे. आगामी होणाऱ्या सणानिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी तडीपारीची कारवाई करून गुन्हेगारांबद्दल सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील परिसरात हे सात आरोपी कधी एकत्र टोळी करून गुन्हे करायचे तर कधी एकटे एकटे या टोळीतील युवकांविरुध्द आचोळ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे सादर केला होता. याची चौकशी व सुनावणी होऊन या गुंडांच्या टोळीस पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले - श्रींगी यांनी पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये पालघर, नाशिक, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये टोळी प्रमुख अजय अमोद मिश्रा (२४), टोळी सदस्य जगन मायंडी पटकटीयार (२०), प्रिषीत उर्फ दीपिका श्रीमोहन पाल (२३), सनी उर्फ अभिषेक महेंद्र टाक (२४), हर्षल दिलीप राठोड (१९), मोहम्मद करीम शकील शेख (२१) आणि राहुल उर्फ टीका रमेश सावंत (२२) यांचा समावेश आहे.’या टोळीतील युवकांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव सुरूच होता. जनतेमधुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे तुळींज आणि आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणुन त्यांच्यावर ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे सर्व स्थरातुन समाधान व्यक्त होत आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुली-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरिक्षक (गुन्हे) विवेक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल जाधव, दत्तात्रय जाधव आणि बुधवंत लोंढे, पोलीस हवालदार प्रशांत सावदेकर, संदीप बडगुजर, उमेश महाले यांनी पार पाडली.

एका टोळीच्या सात सदस्यांना पोलीस उपायुक्तांनी सोमवारी तडीपार करण्यात आले आहे. या सातही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हे तडीपार आरोपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिसल्यास पोलीस ठाण्याशी किंवा माझ्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. - बाळासाहेब पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस