अवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 09:39 PM2021-05-16T21:39:20+5:302021-05-16T21:42:24+5:30

Crime News : याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे, तर तिचा पती अद्याप फरार आहे.

accused women arrested and her husband absconding couple killed man with knife in mangolpuri in delhi | अवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार 

अवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार 

Next
ठळक मुद्देही घटना राजपार्क पोलीस स्टेशन परिसरातील मंगोलपुरी पी-ब्लॉकमधील आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या मंगोलपुरी येथे अवघ्या 100 रुपयांसाठी एका युवकाची चाकूने हत्या करण्यात आल्याची घटना घडली. एका दाम्पत्यावर युवकाचा खून केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे, तर तिचा पती अद्याप फरार आहे. दरम्यान, ही घटना राजपार्क पोलीस स्टेशन परिसरातील मंगोलपुरी पी-ब्लॉकमधील आहे.  (accused women arrested and her husband absconding couple killed man with knife in mangolpuri in delhi)

दिल्ली पोलिसांना 16 मे रोजी कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की माझ्या मुलावर कुणीतरी चाकूने वार केले आहे. हा पीसीआर कॉल संजय गांधी रुग्णालयामधून आला होता. दिल्ली पोलिसांची टीम रुग्णालयात पोहोचली, त्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या युवकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांच्या तपासात मृत युवकाचे नाव अजित असून तो मंगोलपुरी येथील पी ब्लॉक भागात राहत होता.

जितेंद्र नावाच्या व्यक्तीला अजित याचे 100 रुपयांचे देणे होते, याची माहिती पोलिसांना मिळाली. या 100 रुपयांवरून जितेंद्र आणि अजित यांच्यात भांडण झाले होते. भांडण इतके वाढले की जितेंद्र हा चाकू घेऊन अजितच्या घरात घुसला आणि त्याने अजितवर चाकूने हल्ला केला. या भांडण्यात जितेंद्रची साथ त्यांची पत्नी देखील देत होती. जितेंद्रने अजितच्या मांडीवर चाकूने वार केले. यात अजित गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर जितेंद्र आणि त्याची पत्नी पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्रची पत्नी रेश्मा हिला अटक केली आहे, तर जितेंद्रचा पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वी याच भागात किरकोळ कारणामुळे उद्यानात बसलेल्या एका व्यक्तीला चाकूने भोसकून ठार मारण्यात आले होते.

Web Title: accused women arrested and her husband absconding couple killed man with knife in mangolpuri in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app