वेगवेगळ्या वेशभूषा करून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीबाबत माहिती देण्याचे नागरिकांना पोलिसांचे आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 16:02 IST2018-10-17T21:46:51+5:302018-10-18T16:02:43+5:30

या आरोपीविरोधात विरार पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल आहे. 

The accused who tried to make the police by different costumes finally go off | वेगवेगळ्या वेशभूषा करून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीबाबत माहिती देण्याचे नागरिकांना पोलिसांचे आवाहन  

वेगवेगळ्या वेशभूषा करून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीबाबत माहिती देण्याचे नागरिकांना पोलिसांचे आवाहन  

मुंबई - नवी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकावर गोळीबार केलेल्या फरार आरोपी फैय्याज खलीज शेख (वय २६) याचा शोध पोलीस घेत आहेत. वेगवेगळी वेशभूषा धारण करून हा आरोपी पोलिसांना चकवा देत आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत खानिवडे टोल नाका येथील मुंबई - अहमदाबाद हायवेवर आरोपी फैय्याजने गोळीबार केला आणि फरार झाला आहे. विशेषतः हा आरोपी आपली हेअर स्टाईल बदलून आपला पेहराव बदलतो. त्याने आतापर्यंत अनेक हेअर स्टाईल आणि पेहराव बदलले असल्याचे पोलिसांच्या हाती लागलेल्या फोटोतून स्पष्ट झाले आहे. या आरोपीविरोधात विरार पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल आहे. या आरोपीविषयी कोणाला माहिती असल्यास किंवा दिसल्यास त्यांनी पालघर पोलिसांना ८६६३६०४०१८ आणि ८६६३६०४१०० या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे पालघर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. 

सराईत गुन्हेगाराची तिसऱ्यांदा हुलकावणी 

 

Web Title: The accused who tried to make the police by different costumes finally go off