आरोपीवर झाडली गोळी अन् प्रत्यक्षदर्शीचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 15:16 IST2023-12-17T15:15:49+5:302023-12-17T15:16:39+5:30
ही घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

आरोपीवर झाडली गोळी अन् प्रत्यक्षदर्शीचा हृदयविकाराने मृत्यू
नांदेड : शहरातील गुरुद्वारा परिसरात हातात तलवार घेऊन दहशत पसरवत पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीच्या पायावर गोळी झाडून त्याला जेरबंद करण्यात आले. जवळपास तीन तास चाललेल्या या थरारत एका प्रत्यक्षदर्शीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
शेरसिंग गिल असे आरोपीचे नाव आहे, काही दिवसांपूर्वी तो पेरॉल वर बाहेर आला होता. त्याची मानसिक स्थिती ही ठीक नाही. रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गुरुद्वारा गेट क्रमांक 5 परिसरात हातात तलवार घेऊन तो दहशत निर्माण करीत होता. त्यानंतर पोलिस तिथे गेले. परंतु त्याने पोलिसांना हल्ला करण्याची धमकी दिली. घरातून सिलिंडर आणून ते उडवून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलीस ही दोन पावले मागे आली.
या ठिकाणी उपअधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक अशोक घोरबंड, एलसीबीची टीम होती. हा थरार सुरू असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखून गिल च्या पायावर गोळी झाडत त्याला पकडले. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु राजू पाटी या एका प्रत्यक्ष दर्शीचा हृदय विकाराने मृत्यू झाला.