शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

पोलिसांच्या हातावर तुरी देत रुग्णालयातून पलायन करणारा आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:16 PM

वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते रुग्णालयात 

पिंपरी : रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या तीन आरोपींपैकी एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. त्याला मंगळवारी रात्री मोशी येथून जेरबंद करण्यात आले. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.कृष्णा उत्तम सोनवणे (वय १९, रा. तापकीर मळा, चर्च समोर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. आकाश बाबुलाल पवार (वय २१) व गणेश उर्फ अजय दत्तात्रय कांबळे (वय १९, दोघेही रा. नढेनगर, काळेवाडी) अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याप्रकरणी आरोपी यांना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी आणले होते. त्यावेळी आरोपी यांनी गोंधळ घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन आरोपीना पोलिसांनी जागीच जेरबंद केले. तर आरोपी कृष्णा सोनवणे पळून गेला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक  आर. एस. मुदळ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपी रुग्णालयातून पळून गेल्यानंतर मोशी येथे गेला. तेथे त्याच्या ओळखीच्या काही जणांकडून पैसे घेऊन बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील कर्मचारी गणेश सावंत यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपी कृष्णा सोनवणे याला जेरबंद करण्यात आले. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, कर्मचारी सचिन उगले, विजय मोरे, गणेश सावंत, विशाल भोईर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक