पसार झालेला आरोपी ११ वर्षांनी सापडला पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 13:20 IST2020-01-02T13:18:24+5:302020-01-02T13:20:02+5:30
हत्येच्या गुन्ह्यात माझगाव न्यायालयात हजर केले असता तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला.

पसार झालेला आरोपी ११ वर्षांनी सापडला पोलिसांच्या जाळ्यात
ठळक मुद्देत्याच्याविरुद्ध अंधेरी, डी. एन. नगर, काळाचौकी, भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो मुंबईत आल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली.
मुंबई - न्यायालयात नेताना पसार झालेला आरोपी ११ वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. युसूफ मुसा रसूल सय्यद ऊर्फ तोफ ऊर्फ समीर असे त्याचे नाव आहे.
युसूफ मुसा रसूल सय्यदला १३ जून २००८ रोजी हत्येच्या गुन्ह्यात माझगाव न्यायालयात हजर केले असता तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. त्याच्याविरुद्ध अंधेरी, डी. एन. नगर, काळाचौकी, भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
यापैकी अंधेरीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यात त्याला दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा सुनाविली होती. दरम्यान तो मुंबईत आल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.