भिवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

By नितीन पंडित | Updated: October 17, 2023 19:20 IST2023-10-17T19:18:15+5:302023-10-17T19:20:49+5:30

सात आरोपींविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल

Accused in Bhiwandi gang rape case remanded to seven days police custody | भिवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

भिवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या खारबाव गावात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपींविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तालुका पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तर तीन फरार आरोपींचा शोध तालुका पोलीस घेत आहेत.विशेष म्हणजे नराधमांनी दुष्कृत्य करतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता,त्यांनतर हि घटना समोर आली होती.

अटक केलेल्या चारही आरोपींना मंगळवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता या चारही जणांना २३ ऑक्टोबर पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून फरार असलेल्या तीन आरोपींच्या देखील लवकरात लवकर मुसक्या आवळण्यात येतील अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी दिली आहे.

Web Title: Accused in Bhiwandi gang rape case remanded to seven days police custody