शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'या' आरोपीने मराठी अभिनेत्रीकडे देखील मागितली होती खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 20:54 IST

७ महिलांकडे अशा प्रकारे ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे

ठळक मुद्देचेंबूरचा रहिवाशी असलेला सरोदे हा फेसबुक आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून माॅडेलशी संपर्क साधायचा.तो स्वतःची ओळख कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगायचा. तरुणींचे हेच फोटो पिक्सआर्ट या गुगल अ‍ॅपच्या मदतीने माॅर्फ करून तो अश्लील फोटो बनवायचा.

 

मुंबई - कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगून तरुणींशी जवळीक साधून त्यांचे फोटो माॅर्फ करून तरुणींकडे खंडणी मागणाऱ्या सिद्धार्थ सरोदेच्या काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने मुसक्या आवळल्या. त्याने अशा प्रकारे ७ महिलांकडे अशा प्रकारे ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. त्यात एका मराठी अभिनेत्रीचाही समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

चेंबूरचा रहिवाशी असलेला सरोदे हा फेसबुक आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून माॅडेलशी संपर्क साधायचा. त्यावेळी तो स्वतःची ओळख कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगायचा. तरुणींना टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी देतो अशी बतावणी करून तो महिलांचा विश्वास संपादन करत असे. चित्रपटात काम करता येईल या आशेपोटी मोठ्या संख्येने तरुणी त्याच्या संपर्कात आल्या होत्या. अनेक तरुणी त्याला चित्रपटात काम मिळावे म्हणून स्वतःच्या माॅडलिंगचे फोटोही पाठवायच्या. तरुणींचे हेच फोटो पिक्सआर्ट या गुगल अ‍ॅपच्या मदतीने माॅर्फ करून तो अश्लील फोटो बनवायचा. 

सरोदे याने २०१७ मध्ये बोरिवली रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट घडवण्याची अफवा पसरवली होती. त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक करत त्याची रवानगी भायखळाच्या आर्थर रोड कारागृहात केली होती. कारागृहात त्याच्यासोबत असलेला एक आरोपी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. त्याच्याकडून माहिती मिळवत सरोदेने जामीनावर बाहेर आल्यानंतर तरुणींना जाळ्यात ओढत खंडणी उकळण्यास सुरूवात केल्याचे सांगितले. नवघर परिसरातील तरुणींकडून त्याने २५ हजार, वर्सोवा येथील मॉडेलकडून १ लाख आणि ठाण्यातील तरुणीकडून २५ हजार उकळल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तर उर्वरित पाच तरुणींशी पोलिसांनी संपर्क साधला असता त्या तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यात पाच तरुणींमध्ये चेंबूर परिसरात राहणाऱ्या एका मराठी अभिनेत्रीचाही समावेश असल्याचे समजते. 

कशी होती मोडस ऑपरेंडी?

महिलांचे अश्लील फोटो बनवून ते सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या  सिध्दार्थ सरोदेस गुन्हे शाखेच्या कक्ष - ९ अटक केली आहे.वर्सोवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने पीडित महिलेशी व्हॉटस अ‍ॅपवर चॅट करून तिचा चेहरा आणि दुसऱ्या नग्न महिलेचे शरीर असलेला एक पुरूषासोबतचा अश्लील फोटो मॉर्फ करून इंग्रजीत महिलेचे नाव आणि कॉलगर्ल असे लिहिलेला पीडित महिलेला पाठविले. हा फोटो सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडित महिलेकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. नेहमीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीचा मोबाईल वेळोवेळी तपासादरम्यान बंद आढळून येत होता. तरीदेखील कक्ष ९ चे पोलीस शिपाई प्रफ्फुल पाटील आणि महिला पोलीस शिपाई पुजारी यांनी आरोपीच्या मोबाईलवरून सविस्तर तपास करून गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीने किमान ७ महिलांना सोशल मीडियावर गाठून अशा प्रकारे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी सिद्धार्थ महिलांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डायरेक्टर असल्याचे खोटे सांगून त्यांचे फोटो मिळवून ते पिक्सआर्ट या गुगल अ‍ॅपच्या मदतीने अश्लील फोटो तयार करत असे. 

 

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWhatsAppव्हॉटसअ‍ॅप