शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोठडीत सुनावलेल्या आरोपीला फिट आल्याने झाला मृत्यू, चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 14:59 IST

Accused Death : उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहीती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.

डोंबिवली -  येथील मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आणि न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपी दत्तात्रय वारके याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री  साडेआठच्या सुमारास घडली. विलगीकरण कक्षात त्याला फिट आल्याने त्याला उपचारासाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहीती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.

आरोपी वारके विरोधात 5 फेब्रुवारीला शिवीगाळ, दमदाटी आणि छेडछाड प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून त्याचा शोध सुरू होता. अखेर त्याला शनिवारी भुसावळ येथून अटक करण्यात आली. त्याला रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान आरोपीला कल्याण आधारवाडी कारागृहात दाखल करण्याआधी कोविड चाचणी बंधनकारक असल्याने त्याला न्यायालयाच्या आदेशाने मानपाडा पोलिस ठाण्याच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथे असताना वारके ला संध्याकाळी पावणोसहाच्या सुमारास फिट आली आणि तो जमिनीवर पडला. त्याला लागलीच उपचारासाठी मनपाच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले गेले. मात्र काही तासांनी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.अप्पर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चौकशीदरम्यान कोठडीतील आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहीती घेतली. पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह जे जे रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून डॉक्टरांच्या पॅनल खाली त्याचे शवविच्छेदन होणार आहे.घर विक्रीच्या व्यवहारात फसवणूकआरोपी दत्तात्रय हा एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला होता. 2013 ला त्याने एका महिलेकडून घर विक्रीच्या व्यवहारात पाच लाख रूपये घेतले होते. मात्र घराचा ताबा महिलेला मिळत नव्हता. तीने दत्तात्रयकडे तगादा लावला, मात्र त्याच्याकडून योग्य प्रकारे उत्तर दिली जात नव्हती. एक दिवस त्याने महिलेबरोबर फोनवर बोलताना अश्लील संभाषण केले होते. त्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीjailतुरुंगdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसDeathमृत्यू