Accused arrested for sending obscene posts via e-mail | ई-मेलवरून अश्लील पोस्ट पाठविणाऱ्या आरोपीला अटक 

ई-मेलवरून अश्लील पोस्ट पाठविणाऱ्या आरोपीला अटक 

अमरावती:  एका २८ वर्षीय युवतीचे ई-मेल आयडीधारकाशी प्रेमसंबंध होते. त्याचे त्या तरुणीशी ब्रेकअप होताच त्याने तिला ई-मेल आयडीवरुन अश्लील पोस्ट पाठविली ही धक्कादायक घटना विद्युतनगर येथे २१ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी गुरुवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता घटनेचा तांत्रिक तपासाअंती सायबर पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी दुपारी अमरावती येथून अटक केली.  

पोलीस सूत्रानुसार, श्रीकांत नीळकंठ गणवीर (२७, रा. स्वावलंबी नगर अमरावती), असे आरोपीचे नाव आहे. सदर तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ई-मेल आयडीधारकाविरुद्ध भादंविचे कलम ३५४(अ), (ड), सहकलम ६७, ६७ (अ)आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल दाखल केला होेता. पोलीस निरीक्षक प्रवीण काळे व एपीआय रवींद्र सहारे यांनी तपास केला. 

युवतीशी होते प्रेमसंबंध
यातील मोबाईल नंबर तसेच ई-मेल आयडीधारकाशी युवतीचे प्रेम संबंध होते. त्यामुळे ते १० ते १२ महिन्यांपूर्वी एका हॉटेलमध्ये गेले तेव्हा  आरोपीने मुलीचा फोटो काढला होता. मात्र, आता त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात येताच त्याने फिर्यादीच्या ई-मेल आयडीवर अश्लील पोस्ट करुन तिचा विनयभंग केला तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्यामुळे युवतीने सायबर पोलिसांकडे धाव घेवून तक्रार नोंदविली. या घटनेचा सायबर पोलिसांनी तातडीने तपास करुन  आरोपीला शहरातून अटक केली.

Web Title: Accused arrested for sending obscene posts via e-mail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.