लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 15:30 IST2021-06-12T15:29:28+5:302021-06-12T15:30:10+5:30
Crime News: पेण शहरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला पेण पोलिसांनी गजाआड केले आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत
वडखळ - पेण शहरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला पेण पोलिसांनी गजाआड केले आहे.पेण शहरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पेण शहरतीलच संशयित आरोपी श्रेयस सुरेश बाटे ( वय 19) राहणार बाटेवाडा, नंदीमाळ नाका याने 1 डिसेंबर 2020 ते 8 जून 2021 या कालावधीत सदर अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याने ही अल्पवयीन मुलगी 5 महीन्याची गर्भवती राहिली आहे.
या बाबत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पेण पोलिसांनी संशयित आरोपी श्रेयस बाटे याच्या विरूद्ध गुन्हा रजिस्टर नं.154/ 2021 भा. द. वि. कलम 376,376 ( 2 ),बाल लैंगिक संरक्षक कायदा 2012 प्रमाणे अटक केली आहे. या बाबत उप विभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण ,पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे या अधिक तपास करत आहेत.