अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 22:27 IST2021-11-11T22:25:55+5:302021-11-11T22:27:27+5:30
घरातील लाईटचे झुंबर दाखविण्याच्या बहाण्याने ९ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवलीः घरातील लाईटचे झुंबर दाखविण्याच्या बहाण्याने ९ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून आरोपी दिलीप धूरी (वय ५९) याला विष्णुनगर पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
ही घटना रविवारी दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर परिसरातील एका इमारतीत घडली. पिडीत मुलगी आरोपी दिलीप च्या परिचयाची असून लाईटचा झुंबर दाखविण्याच्या बहाण्याने तो तीला घरी घेऊन गेला आणि चाँकलेट खाण्यास देऊन तिच्याशी गैरकृत्य केले. हा प्रकार रविवारी घडला परंतू घडलेल्या प्रकारामुळे मुलगी आणि तीचे कुटुंब घाबरले होते. अखेर तीच्या आईने मंगळवारी विष्णुनगर पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी दिलीपला अटक केली असून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.