पत्नीसाठी मुलीचे केले अपहरण, बदलापूर येथून केली आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:35 IST2019-05-10T01:35:04+5:302019-05-10T01:35:17+5:30

अंडे खाण्याच्या बहाण्याने तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बदलापूर येथून बुधवारी रात्री अटक केली.

Accused arrested for kidnapping for wife, Badlapur | पत्नीसाठी मुलीचे केले अपहरण, बदलापूर येथून केली आरोपीस अटक

पत्नीसाठी मुलीचे केले अपहरण, बदलापूर येथून केली आरोपीस अटक

भिवंडी : अंडे खाण्याच्या बहाण्याने तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बदलापूर येथून बुधवारी रात्री अटक केली. जुन्या कौटुंबिक भांडणातून ही घटना घडल्याचे उघड झाले असून याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
शहरातील देवूनगर येथील मोहम्मद अली कंपाउंड येथे राहणाºया मोह. इर्शाद मो. इद्रीस अन्सारी याची तीन वर्षांची मुलगी आलिया हिला बुधवार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अंडे खाण्यास घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेलेला अब्दुल कलाम अजीज चौधरी हा मुलीला परत घेऊन घरी न आल्याने मुलीच्या वडिलांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. अखेर त्याचा तपास न लागल्याने मो. इर्शाद याने रात्री सव्वा वाजता भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला असता अपहरणकर्त्याच्या मोबाइलचे लोकेशन बदलापूर येथील वालवली गावात दिसून आले. पोलिसांनी सापळा लावला आणि आरोपी अब्दुल कलाम यास तीन वर्षांच्या आलियासह ताब्यात घेतले. अब्दुल कलाम अजीज चौधरी यांस गुरुवारी दुपारी पोलिसांनी भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यास कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली.
आरोपी अब्दुल अजीज चौधरी हा मजुरी करणारा असून तो व्यसनाधीन झाल्याने त्याची पत्नी त्याला सोडून गेली. ती अब्दुल अजीज याचा भाऊ असलेल्या मोहम्मद इर्शाद मो. ईद्रीस अन्सारी या सोबत राहू लागली. आपली पत्नी परत मिळावी,या उद्देशाने आरोपीने मोहम्मद इर्शाद अन्सारी याच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून त्या बदल्यात आपल्या पत्नीची मागणी केली, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे .

Web Title: Accused arrested for kidnapping for wife, Badlapur