टेम्पोत फिरवून आणतो म्हणत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 21:53 IST2022-03-01T21:46:11+5:302022-03-01T21:53:37+5:30
२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास फैजल याने त्याच्या टेम्पोतुन फिरवून आणतो असे अमिष दाखवुन १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस भाईंदर पूर्व भागातून नालासोपारा फाटा येथे नेले.

टेम्पोत फिरवून आणतो म्हणत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक
मीरारोड - भाईंदर पूर्वेला राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस टेम्पोतून फिरवून आणतो सांगून नालासोपारा फाटा येथे नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी मोहमद फैजल सरवर, रा. नालासोपारा पुर्व, ता. वसई यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.
२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास फैजल याने त्याच्या टेम्पोतुन फिरवून आणतो असे अमिष दाखवुन १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस भाईंदर पूर्व भागातून नालासोपारा फाटा येथे नेले. तेथील पत्र्याचे शेडमध्ये तिला नेऊन जबरी बलात्कार केला. तिचा मोबाईल काढुन घेत झालेला प्रकार कोणाला सांगितला तर जिवे ठार मारेन असे धमकावले होते. २७ रोजी या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कार सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन सरंक्षण अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, उपनिरीक्षक सनिल पाटील सह योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर यांच्या पथकाने गुन्हयाचे घटनास्थळावर मिळालेल्या तांत्रिक माहीती व गुप्त बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पीडित मुलीस आरोपी बद्दल माहिती नव्हती.