मांडूळ विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 09:58 PM2019-03-08T21:58:52+5:302019-03-08T22:00:21+5:30

मांडुळ सर्पाच्या विक्रीत सक्रिय होता हा आरोपी  

The accused arrested by the crime branch arrested from the crime branch | मांडूळ विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

मांडूळ विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

Next
ठळक मुद्देजप्त करण्यात आलेल्या सापाची किंमत 30 लाख रुपये आहे.याप्रकरणी आरोपीला 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मुंबई - मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या 32 वर्षीय आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली. अब्दुल कादीर अब्दुल सत्तार पटेल असं अटक आरोपीचे नाव असून तो कल्याणचा रहिवासी आहे. त्याच्याकडून तीन किलो 480 ग्रॅम वजनाचा सर्पाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला अंधेरी पूर्व येथील मेट्रो स्थानकाखालून अटक केली आहे. आरोपी 47 इंचाचा सर्प घेऊन घुटमळत असताना आढळला. जप्त करण्यात आलेल्या सापाची किंमत 30 लाख रुपये आहे. याप्रकरणी आरोपीला 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Web Title: The accused arrested by the crime branch arrested from the crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.