'' त्या '' जखमी तरुणीचा खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी २४ तासांत गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 06:39 PM2019-09-07T18:39:01+5:302019-09-07T18:40:46+5:30

तिचा खून करण्याचे उद्देशाने तिच्या डोक्यात, कानाच्यावर व उजव्या डोळ्यावर दगडाने गंभीर मारहाण केली.

accused arrested in the 24 hours who trying murdered of injured girl | '' त्या '' जखमी तरुणीचा खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी २४ तासांत गजाआड 

'' त्या '' जखमी तरुणीचा खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी २४ तासांत गजाआड 

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी 

बारामती : बारामती तालुक्यात गोजुबावी येथे काही दिवसांपुर्वी  तरुणीच्या खुनाचा  प्रयत्न करण्यात आला होता.मात्र,या प्रकरणी आरोपी फरार झाल्याने याप्रकरणाचे गुढ वाढले होते. मात्र, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  या तरुणीच्या खुनाच्या प्रयत्नाचे गूढ उकलले आहे.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे (एल.सी.बी.) पथकाचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी याबाबत माहिती दिली. २ ऑगस्ट २०१९ रोजी गोजुबावी, आटोळे वस्ती (ता.बारामती )येथे पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तेथील ग्रामस्थांना एक तरूणी गंभीर जखमी व बेशुध्द अवस्थेत आढळून आली. त्यांनी पोलीसांना कळवून तिला लगेच बारामती सिल्वर ज्युबली हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी पोलिसांनी तिच्या नातेवाईक आईवडिलांना संपर्क साधला.  तसेच, ससून हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. मुलीची आई विमल मल्लु चव्हाण(वय ४५,रा.हडपसर,ससाणेनगर,ता. हवेली,जि.पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली होती.त्यानुसार त्यांची २२ वर्षीय मुलगी पुजा मल्लु चव्हाण (रा.ससाणेनगर, हडपसर, पुणे)  तिचा अज्ञात मित्र नाव पत्ता माहीत नाही .त्याने पुजाला दुचाकीवरून घेऊन जावून कोणत्यातरी कारणावरून तिचा खून करण्याचे उद्देशाने तिच्या डोक्यात, कानाच्यावर व उजव्या डोळ्यावर दगडाने गंभीर मारहाण केली. तिच्या कानातील रिंगा, बॅग, कपडे व  इतरसाहित्य असा माल जबरीने पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने घेऊन गेल्याची फिर्याद बारामती तालुका पोलीस स्टेशनला दिली होती.
    याप्रकरणी तपास गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील व बारामती अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी पोलीस निरीक्षकपद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा.पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, महेशगायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, नितीन भोर, सुभाष राऊत, गुरू गायकवाड,अक्षय जावळे यांचे पथकाकडून गुन्हयाची माहिती घेवून तपासाला सुरूवात केली. सदर पथकाने परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची पडताळणी करून काळे रंगाचे सीडी डिलक्स गाडीवरील संशयीत आरोपी निश्चित केला. त्याप्रमाणे संशयित आरोपीचे फोटो बनवून त्याआधारे हडपसर परिसरात तरुणी जेथे कामास होती . त्या ठिकाणी जावून तेथील कामगार, वॉचमन, तरूणीचे मित्र, मैत्रीण यांचेकडे तपास करून फोटो दाखवून माहिती काढली . तो फोटो हडपसर येथे पूर्वी सिक्युरीटी गार्डचे काम सोडून गेलेला युवराज दिगंबर ढेरे (वय २२रा.साडेसतरानळी, सव्हें नं.२०३, हडपसर, पुणे )याचा असल्याची माहिती एका वॉचमनकडून मिळाली.  तो चारपाच दिवसापासून बाहेर जाताना मास्क लावत असल्याची व तो सध्या साडेसतरा नळी चौक येथे तोंडाला मास्क लावून थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यास तेथून ताब्यात घेवून चौकशी केली असता प्रथम त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीस तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शाखेचे पथकाचे कौतुक करून त्यांना बक्षीस जाहीर केलेले आहे.

Web Title: accused arrested in the 24 hours who trying murdered of injured girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.