शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार उकळले; लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 20:57 IST

शहरात संचारबंदी असताना बिबवेवाडी येथे पोलिसांनी ही बस पकडली होती.

ठळक मुद्दे एकाला अटक, निरीक्षकाची चौकशी सुरु

पुणे : लॉकडाऊनच्या काळात पकडलेली बस सोडविण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार रुपये घेणाºयास बिबवेवाडी पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची चौकशी करण्यात येत आहे. सुखदेव भिमदान चारण (वय ३७, रा. काकडे वस्ती, कोंढवा,मुळ गाव राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नरसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २४, रा.रघुवंशन अपार्टमेंट, नांदेड गाव) यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार सुखसागरनगर येथील आंबामाता मंदिराजवळ १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडला होता़. चारण याने पोलीस निरीक्षक (गुन्हे) मुरलीधर खोकले यांच्या सांगण्यावरुन ५० हजार रुपये घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती अशी, राज पुरोहित यांचा मित्र मनोहर सिंह याच्या मालकीची राजलक्ष्मी ट्रॅव्हल्स बस आहे. शहरात लॉकडाऊन असताना संचारबंदीमध्ये बिबवेवाडी पोलिसांनी ती पकडली होती. त्यावेळी चारण हा राजपुरोहत यांना भेटला. त्याने पोलीस अधिकाºयांच्या मदतीने बस सोडून देतो,असे सांगून १४ जुलै रोजी बसचालकाकडून ५० हजार रुपये घेतले. दरम्यान, तीन दिवसांनी १७ जुलै रोजी ही रक्कम त्याने चालकाला परत केली. ही माहिती वरिष्ठ पोलिसांना समजल्यानंतर चौकशी सुरु झाली. त्यात चारण याने संतोष लड्डा याच्या ओळखीने पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी बस सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्यावरुन चारण याने ही रक्कम घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर चारण याला पोलिसांनी अटक केली. चारण याला बुधवारी न्यायालयात हजर केले.चारण याच्या मदतीने पोलीस निरीक्षक खोकले यांच्याकडे तपास करायचा आहे. संतोष गड्डा याने आरोपीची मुरलीधर खोकले यांच्याबरोबर ओळख करुन दिल्याचे तपास आढळून आले़ त्यामुळे संतोष गड्डा याच्याकडे तपास करायचा आहे़ राजलक्ष्मी ट्रॅव्हल्स बसचे चालक अरविंद गोस्वामी यांनी आरोपीला पैसे देताना कोण हजर होते, त्याचा तपास करायचा आहे. आरोपीने ५० हजार रुपये ३ हजार रुपये स्वत: कडे का ठेवले, याची चौकशी करायची आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज व इतर संशयितांचे मोबाईलचे सीडीआर प्राप्त करुन त्याची पडताळणी करुन आरोपी व संशयितांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग आहे का याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली़ न्यायालयाने आरोपीला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे अधिक तपास करीत आहेत. ..........या प्रकरणातील आरोपीचे हे सांगणे आहे. त्याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे़ पोलीस निरीक्षक खोकले हे आज सुट्टीवर गेले आहेत. आम्ही चौकशी करुन जो पुरावा समोर येईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल.सुहास बावचे, पोलीस उपायुक्त.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिसArrestअटकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस