Video : बर्फ घेऊन जाणाऱ्या ट्रकचा तुर्भे उड्डाणपुलावर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:42 IST2019-07-24T15:38:22+5:302019-07-24T15:42:12+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

Video : बर्फ घेऊन जाणाऱ्या ट्रकचा तुर्भे उड्डाणपुलावर अपघात
नवी मुंबई - तुर्भे उड्डाणपुलावर बर्फ घेऊन वाशीच्या दिशेने चाललेला ट्रक पलटला आहे. आज हा अपघात झाला असून पुलाच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला आहे. मात्र, या अपघातात जीवितहानी नाही. या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला होता. दरम्यान, अपघातानंतर रस्त्यावर पडलेला बर्फ आणि अपघातग्रस्त ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे उड्डाणपुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
नवी मुंबई - तुर्भे उड्डाणपुलावर ट्रक पलटी, बर्फ घेऊन वाशीच्या दिशेने चाललेला ट्रक, पुलाच्या वळणावर ताबा सुटल्याने ट्रक पलटी, जीवितहानी नाही https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 24, 2019