Accident in Toranmal: नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात, क्रूझर दरीत कोसळून आठ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 18:41 IST2021-07-18T18:41:13+5:302021-07-18T18:41:49+5:30
Accident in Nandurbar district: धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या तोरणमाळ येथील खडकी रस्त्यावर सिंधी गावाकडे जाणारी क्रूझर गाडी दरीत कोसळली.

Accident in Toranmal: नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात, क्रूझर दरीत कोसळून आठ ठार
ब्राह्मणपुरी (नंदुरबार): तोरणमाळ हून खडकी पॉईंट येथून सिंधी येथे जाताना क्रूझर टॅक्सी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Cruser Accident in Nandurbar; 8 died on the spot.)
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या तोरणमाळ येथील खडकी रस्त्यावर सिंधी गावाकडे जाणारी क्रूझर गाडी दरीत कोसळली. एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. या अपघातात 8 जण ठार झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले.
उर्वरित जखमींवर तोरणमाळ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रूझर दरीत कोसळण्यापूर्वी प्रवाशांनी गाडीबाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.