श्रीरामपूर नेवासे मार्गावर अपघात, पाचेगाव येथील दुचाकीस्वार ठार

By शिवाजी पवार | Updated: April 18, 2023 14:03 IST2023-04-18T14:03:52+5:302023-04-18T14:03:59+5:30

मंगळवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली.

Accident on Srirampur Nevase Road, Pachegaon bike rider killed | श्रीरामपूर नेवासे मार्गावर अपघात, पाचेगाव येथील दुचाकीस्वार ठार

श्रीरामपूर नेवासे मार्गावर अपघात, पाचेगाव येथील दुचाकीस्वार ठार

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर नेवासा महामार्गावर वडाळा महादेव नजीक दुचाकीच्या झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील एक युवक ठार झाला. मंगळवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली.

मयताचे नाव द्रोणाचार्य दत्तात्रय तुवर  (वय २८, रा. पाचेगाव) असे आहे. कोपरगाव येथे दुचाकीवर (एमएच १७ सी एन ७१४२) नोकरीस जात असताना हा अपघात झाला. स्थानिकांनी जखमी तुवर याला साखर कामगार रुग्णालयात हलविले. मात्र डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तुवर याला मृत घोषित करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन बहीण, चुलते, चुलत भाऊ असा परिवार आहे. अशोक साखर कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय तुवर यांचा तो मुलगा आहे.

Web Title: Accident on Srirampur Nevase Road, Pachegaon bike rider killed