धुळ्यात लाचखोर वाहतूक पोलिसावर एसीबीचा ट्रॅप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 13:32 IST2023-05-03T13:32:37+5:302023-05-03T13:32:37+5:30
दोनशे रुपयांची लाच मागताना पकडला गेला पोलीस कर्मचारी

धुळ्यात लाचखोर वाहतूक पोलिसावर एसीबीचा ट्रॅप
राजेंद्र शर्मा, धुळे: वाहन सोडण्यासाठी दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्या धुळे शहर वाहतूक दलातील पोलीस हवालदार उमेश दिनकर सूर्यवंशी यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सकाळी लाच स्वीकारताच अटक केल्याने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात हा धुळे शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलसमोरील रस्त्यावर हा सापळा यशस्वी करण्यात आला.