शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

बांधकाम उपअभियंत्याला लाच घेताना एसीबीने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 20:37 IST

शाखा अभियंताही ताब्यात

ठळक मुद्दे तक्रारीवरून अन्य अभियंत्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.दोन टक्के दराने ४००० रुपये लाचेची मागणी केलीतक्रारदाराकडून नऊ हजारांची लाच घेताना साकुरेला ४ नोव्हेंबर रोजी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

धामणगाव रेल्वे (अमरावती) - सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या २५ वर्षीय कंत्राटदाराला एमबी बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी दोन शासकीय अभियंत्यांकडून लाचेची मागणी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ नोव्हेंबर रोजी कारवाई करून उपअभियंत्याला धामणगावातील नेहरूनगर येथील त्याच्या निवासस्थानाहून लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. तक्रारीवरून अन्य अभियंत्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा चांदूर रेल्वे येथील उपअभियंता किशोर हरिभाऊ साकुरे (५७) व धामणगाव रेल्वे पंचायत समिती बांधकाम विभागाचा शाखा अभियंता गजेंद्र जयसिंग परमाल अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराने केलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे एमबी बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी सेक्शन इंजिनीअर गजेंद्र जयसिंग परमाल याने ७ ऑगस्ट रोजी दोन टक्के दराने ४००० रुपये लाचेची मागणी केली आणि ८ व १४ ऑगस्ट रोजी ही रक्कम स्वीकारली. याच एमबी बुकवर उपअभियंता किशोर हरिभाऊ साकुरे याची स्वाक्षरी घेण्यासाठी तक्रारदार १४ ऑगस्ट रोजी गेले असता, त्यानेसुद्धा दोन टक्के दराने ४००० रुपये व पूर्वीच्या पेव्हरच्या कामातील ५००० रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. यानंतर धामणगाव रेल्वे येथील नेहरूनगरातील साकुरे याच्या घरी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून नऊ हजारांची लाच घेताना साकुरेला ४ नोव्हेंबर रोजी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.दत्तापूर पोलीस ठाण्यात हे प्रकरण वर्ग करण्यात आले असून,  वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, हवालदार माधुरी साबळे, नायक पोलीस शिपाई सुनील वºहाडे, पोलीस शिपाई अभय वाघ व महेंद्र साखरे आणि चालक नायक पोलीस शिपाई चंद्रकांत जनबंधू यांनी कारवाई केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAmravatiअमरावतीPoliceपोलिसpwdसार्वजनिक बांधकाम विभागArrestअटक