शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडून गटविकास अधिकारी, वाहनचालकास शिवीगाळ व मारहाण; सोमाटणे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 21:35 IST

कोरोना पॉझिटिव्ह आईला घेऊन जाण्यासाठी आल्याच्या संशयातून कृत्य 

ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा आणल्याप्रकणी पोलिसांनी गुन्हा दाखल

पिंपरी : कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांसह त्यांच्या वाहनचालकास शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. सोमाटणे ग्रामपंचायत कार्यालय येथे सोमवारी (दि. २७) सायंकाळी ही घटना घडली. मारहाण करणारी व्यक्ती व त्याची आई कोरोना पॉझिटिव्ह आहेत. आपल्या आईला घेण्यासाठीच हा ताफा आला असल्याचा संशय आल्याने मारहाण केल्याचे त्याने सांगितले.या प्रकरणी शासकीय वाहनाचे चालक शिवाजी पांडुरंग पाटील (वय ५५, रा. चौधरी पार्क, दिघी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमाटणे येथील ३५ वर्षीय व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुण वाढत आहेत. त्यामुळे याबाबत आढावा घेण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. त्यानुसार मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत सोमवारी सोमाटणे गावात गेले होते.ग्रामपंचायत कार्यालयात आढावा घेत असताना त्यांचा वाहनचालक शिवाजी पांडुरंग पाटील यांना आरोपी याने तोंडाचा रुमाल आवळून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. झटापट सोडवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधीर भागवत आले असता त्यांनाही मारहाण व दमदाटी केली.दरम्यान, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र वाघमारे, लिपिक जीवन गायकवाड, शिपाई कैलास तुकाराम मुºहे घटनास्थळी धावून आले. त्यानंतर आरोपी याला  ग्रामपंचायत कार्यालय कोंडले. त्याला विचारपूस केली असता, माझी आई कोरोना पॉझिटिव्ह असून माझ्या आईला घेऊन जाण्यासाठी आले असल्याचा संशय आला. त्यामुळे मी शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली, असे त्याने सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस