शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्रापूर येथे डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 19:59 IST

याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना केली अटक.

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर ) येथे कोविड केअर सेंटरमध्ये एका महिलेवर उपचार करण्यात आले.परंतू, डॉक्टरांनी पूर्ण बिल मागितल्यामुळे या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्‍टरांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना या प्रकरणी तत्काळ अटक केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी अनिल जगताप यांनी दिली. याप्रकरणी डॉ. अजिंक्‍य तापकीर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रमेश थोरात, स्वप्नील वाघोल व रोहित गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका चंद्रकांत थोरात (वय ५६, रा. शिक्रापूर) व त्यांची मुलगी नीता अनिल गायकवाड (वय ३५) या दोघी मायलेकी माऊलीनाथ हॉस्पिटलमध्ये १४ दिवस उपचार घेऊन बऱ्या झाल्या. दोघींचेही बिल थकविले म्हणून हॉस्पिटलचे डॉक्‍टर डॉ. अजिंक्‍य तापकीर यांनी त्यांना बिल मागितले. तसेच पूर्ण बिल भरले नाही म्हणून त्यांना डिस्चार्ज कार्ड व काही बिले दिली नाही. मेडिक्‍लेमसाठी आवश्‍यक बिले ती पूर्ण पैसे दिल्यानंतर देवू असे ते म्हणाले. दरम्यान, त्या दोघींचे नातेवाईक असलेले नीलेश थोरात व रमेश थोरात यांनी यांनी डॉक्‍टरांना वारंवार दमदाटी केली. मंगळवारी (ता. २९) रमेश थोरात, गोविंद गायकवाड व इतर दोघांनी डॉ. तापकीर यांना धक्काबुक्की जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत .

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरArrestअटक