लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; संशयित फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 19:09 IST2023-09-09T19:08:07+5:302023-09-09T19:09:10+5:30

साक्रीतील घटना; संशयित फरार

Abuse of a girl by luring her into marriage; Suspect absconding | लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; संशयित फरार

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; संशयित फरार

धुळे : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार साक्री आणि धुळे शहरातील देवपूर भागात वेळोवेळी घडली. आपली फसगत होत असल्याचे लक्षात येताच मुलीच्या आईने साक्री पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दाखल केली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याचे कळताच संशयिताने पळ काढला आहे.

साक्री येथील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीशी एकाने मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात केले. यातून तिला विश्वासात घेत लग्नाचे आमिष दाखविले. तिला साक्री येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. कॉलेज सुटल्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविण्यात आले. तिला धुळ्यातील देवपूर भागात राहणाऱ्या बहिणीच्या घरी घेऊन गेला. तिथेही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आमिष दाखविले. परंतु, आपली फसगत होत असल्याचे लक्षात येताच मुलीने आपले घर गाठले आणि घरातील मंडळींना घडलेली हकिगत कथन केली. याप्रकरणी मुलीच्या आईने साक्री पोलिस ठाणे गाठत पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. संशयित फरार झाला असून, पाेलिस त्याच्या मागावर आहेत.

Web Title: Abuse of a girl by luring her into marriage; Suspect absconding