शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अबू सालेमचा जबाब नोंदवला, पुढील सुनावणी ४ ऑगस्टला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 21:58 IST

Abu Salem : सालेमला कडेकोट बंदोबस्तात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले.

बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा जबाब नोंदवण्यात आला आहे. विशेष न्यायदंडाधिकारी समृद्धी मिश्रा यांच्यासमोर सीआरपीसीच्या कलम ३१३ अंतर्गत अबू सालेमचा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 4 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सालेमला कडेकोट बंदोबस्तात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अबू सालेम उर्फ ​​अब्दुल कयूम अन्सारी, त्याचे सहकारी परवेज आलम आणि समीरा जुमानी यांनी 1993 मध्ये लखनऊ पासपोर्ट कार्यालयात अकील अहमद आझमी यांच्या नावाने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. आरोपींनी या अर्जासोबत बनावट नाव आणि पत्त्याची बनावट कागदपत्रे जोडली होती आणि पासपोर्ट मिळवल्यानंतर त्याचा वापर केला होता. त्याचवेळी अबू सालेमला बनावट पासपोर्ट प्रकरणात मदत करणारा परवेझ आलम नावाचा आरोपीही न्यायालयात हजर झाला आणि त्याचा जबाब नोंदवला. डॉन अबू सालेम 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर त्याची कथित पत्नी समीरा जुमानीसह भारतातून पळून गेला होता आणि या प्रकरणाचा तपास केला असता अबू सालेम आणि त्याची पत्नी बनावट पासपोर्ट बनवून, नाव बदलून भारतातून पळून गेल्याचे आढळून आले.  

टॅग्स :Abu Salemअबु सालेमCourtन्यायालयpassportपासपोर्टjailतुरुंग