शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील ५० टक्के कैदी आहेत तिशीपार, हत्येच्या गुन्ह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 07:11 IST

Crime News : महाराष्ट्रामध्ये एकूण ४३ कारागृहे असून त्यात ९ मध्यवर्ती कारागृहे, एक महिला, तर २८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे.

मुंबई : राज्यभरातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांमध्ये ५० टक्के  कैदी ३० ते ५० वयोगटातील आहेत. यात हत्येच्या गुह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण ४३ कारागृहे असून त्यात ९ मध्यवर्ती कारागृहे, एक महिला, तर २८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. यात एनसीआरबीच्या  २०१९ च्या अहवालानुसार, कारागृहाची एकूण क्षमता २४ हजार ९५ इतकी असताना, कारागृहात एकूण ३६ हजार ७९८  कैदी आहेत.  यात ३५ हजार २२९ पुरुष आणि १ हजार ५६९ महिला कैद्यांचा समावेश आहे. मध्यवर्ती कारागृहाची क्षमता १४ हजार ४९१ असताना त्याच्या दुप्पट म्हणजे २५ हजार ७३१ कैदी या कारागृहामध्ये कोंबण्यात आले आहेत. तर जिल्हा कारागृहातही तीच परिस्थिती असून ८ हजार ८३० कैदी आहेत. यापैकी मुंबईत दोन मध्यवर्ती आर्थर रोड आणि भायखळा कारागृह आहे.  यात महिला कारागृहात २६२ कैद्यांची क्षमता असताना ३६३ महिला कैदी आहेत. या कारागृहामध्ये अंडरट्रायल कैद्यांपैकी १८ ते ३० वयोगटातील १२ हजार ३७३ कैदी आहेत. ३० ते ५० मध्ये १२ हजार ९२८, ५० वर्षे आणि त्यापुढील २ हजार २५६ कैदी आहेत. तर दोषी सिद्ध झालेल्या कैद्यांमध्ये १८ ते ३० मध्ये २ हजार ५७७, ३० ते ५० मध्ये ५ हजार ३९३ आणि ५० वर्षे आणि त्यापुढील १ हजार १२६ कैद्यांचा समावेश आहे. 

१७ हजार कैदी पॅरोलवर बाहेरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात १७ हजार कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले. राज्यभरातील कारागृहांमध्ये एकूण १ हजार ५६९ महिला कैदी आहेत, तर भायखळा येथे असलेल्या महिला कारागृहात २६२ कैद्यांची क्षमता असताना ३६३ महिला कैदी आहेत. यात ७२ महिला या आपल्या मुलांसोबत कारागृहात आहेत. 

मारेकरी अधिकगेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, कारागृहातील एकूण कैद्यांपैकी १२ हजार ५५ कैदी हे हत्येच्या गुह्यांतील आहेत. यापैकी ५ हजार १९० कैदी दोषी सिद्ध होऊन शिक्षा भोगत आहेत, तर ६ हजार ८६५ जणांवर खटला सुरू आहे.

टॅग्स :jailतुरुंगCrime Newsगुन्हेगारी