आपच्या नगरसेवकाची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 14:21 IST2022-08-01T13:41:10+5:302022-08-01T14:21:40+5:30
Firing Case : मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अकबर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.

आपच्या नगरसेवकाची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
पंजाबमधील मलेरकोटला येथे आम आदमी पक्षाच्या नगरसेवकावर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. वास्तविक, आरोपीने त्यांच्यावर जिममध्ये गोळ्या घातल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अकबर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.
मलेरकोटला वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) अवनीत कौर सिद्धू यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली होती की, मोहम्मद अकबर जिममध्ये आले होते, त्यावेळी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अकबर यांना गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमनस्यातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वैयक्तिक कारणावरून आरोपीने त्यांची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आम आदमी पक्षाचे नगरसेवक मोहम्मद अकबर हे जिमच्या आत अज्ञात व्यक्तीकडे जाताना दिसत आहेत, अकबर त्याच्याजवळ जाताच हल्लेखोराने शस्त्र काढून त्याच्यावर गोळीबार केला.
पोलिसांनी सांगितले की, 2 जणांनी ही घटना घडवली आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून सातत्याने छापेमारी सुरू आहे.