युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून केले ठार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

By मनोज शेलार | Updated: February 16, 2024 14:16 IST2024-02-16T14:16:15+5:302024-02-16T14:16:36+5:30

मयत हा गुजरात येथील रहिवासी आहे.

A youth was stabbed to death with a sharp weapon; A case has been registered against four in nandurbar | युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून केले ठार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून केले ठार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

नंदुरबार : चार अज्ञात युवकांनी युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी लहान शहादा,  ता.  नंदुरबारनजीक  घडली. याबाबत नंदुरबार उपनगर पोलिसात अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत हा गुजरात येथील रहिवासी आहे. संजय रंजित ठाकरे (२२) रा. हिंगणी, ता. निझर (गुजरात) असे मयताचे नाव आहे. 

पोलिस सूत्रांनुसार, ठाकरे हा युवक त्याच्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३९ एई ६७०७) हिंगणी येथे लहान शहादा ते शिंदे रस्त्याने जात होता. लहान शहादापासून एक किलोमीटर अंतरावर त्याचा चार युवकांनी दुचाकीवर पाठलाग केला. त्याच्या दुचाकीसमोर त्यांची दुचाकी उभी करून त्याच्याशी वाद घालत तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार केले. त्यानंतर चौघे युवक तेथून पसार झाले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच उपनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजोग बच्छाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत कुणाल चुनीलाल पाडवी यांनी फिर्याद दिल्याने चौघा अज्ञात युवकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहे.

Web Title: A youth was stabbed to death with a sharp weapon; A case has been registered against four in nandurbar