पायी घरी निघालेल्या तरूणाला मारहाण करून लुटले; सात जणांविरूद्ध गुन्हा

By सागर दुबे | Updated: April 25, 2023 15:22 IST2023-04-25T15:21:59+5:302023-04-25T15:22:10+5:30

महेंद्र कोंडे हे सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून पिंप्राळ्यातील भवानी मंदिरकडून मढी चौक मार्गे पायी घरी जात होते.

A young man walking home was beaten and robbed; Crime against seven persons | पायी घरी निघालेल्या तरूणाला मारहाण करून लुटले; सात जणांविरूद्ध गुन्हा

पायी घरी निघालेल्या तरूणाला मारहाण करून लुटले; सात जणांविरूद्ध गुन्हा

जळगाव : दुकान बंद करून पायी घरी निघालेल्या महेंद्र रामलाल कोंडे (३८, रा. धनगरवाडा, पिंप्राळा) या तरुणाला सात जणांनी रस्त्यात अडवून त्याला मारहाण करत सोन्याची अंगठी व एक हजार रूपये रोख चोरुन नेल्याचा प्रकार पिंप्राळ्यातील मढी चौके येथे सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

महेंद्र कोंडे हे सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून पिंप्राळ्यातील भवानी मंदिरकडून मढी चौक मार्गे पायी घरी जात होते. मढी चौकात आल्यानंतर त्यांनी सात जणांनी रस्त्यात अडवून एकाने त्यांना तुझ्या खिशात किती पैसे आहे, ते सगळे काढ असे, सांगितले. पण, कोंडे यांनी त्यांचा विरोध केल्यानंतर काहींनी त्यांना पकडून ठेवले. 

नंतर एकाने त्यांच्या खिशातील एक हजार रूपये रोख तर दुस-याने हातातील २१ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर त्यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून पोलिसात जर तक्रार दिली तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार कोंडे यांनी कुटूंबियांना सांगितल्यानंतर मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सात जणांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title: A young man walking home was beaten and robbed; Crime against seven persons