धुळ्यात जुन्या भांडणाच्या वादातून तरूणावर तलवारीने हल्ला
By अतुल जोशी | Updated: June 9, 2023 18:32 IST2023-06-09T18:32:12+5:302023-06-09T18:32:32+5:30
याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्यात जुन्या भांडणाच्या वादातून तरूणावर तलवारीने हल्ला
धुळे : जुन्या भांडणाच्या वादातून तलवारीने हल्ला करून तरुणाला जखमी केल्याची घटना शहरातील इस्तेगामा मशिदीजवळ ७ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या भांडणाचा वाद उकरून संशयित आरोपींनी मोहमद शाह (वय २५) याची दुचाकी अडवून त्यास शिवीगाळ केली. संशयितांपैकी एकाने तलवारीने मोहम्मद शाह याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला वार करून गंभीर दुखापत केली. दुसऱ्याने तोंडावर मारहाण केल्याने, दातांना दुखापत झाली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोलिस उपनिरीक्षक डी. आर. पाटील करीत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे निरीक्षक धीरज महाजन, पोलिस उपनिरीक्षक संदीप ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. संशयित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.