पाचवीच्या मुलीचा पाठलाग करत फोटो काढल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: July 13, 2023 16:53 IST2023-07-13T16:52:44+5:302023-07-13T16:53:30+5:30

पीडित मुलगी ही पाचवीमध्ये शिकत आहे. ती दररोज शाळेला जाताना आरोपी हा पीडितेचा फोटो काढत होता.

A young man has been booked for stalking a 5th grade girl and taking a picture | पाचवीच्या मुलीचा पाठलाग करत फोटो काढल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

पाचवीच्या मुलीचा पाठलाग करत फोटो काढल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

सोलापूर : पाचवीतील मुलीचा पाठलाग करत तिचा फोटो काढल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेच्या पित्याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नरेंद्र ऊर्फ राम दत्तात्रय बोधले ( रा. सोलापूर ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी ही पाचवीमध्ये शिकत आहे. ती दररोज शाळेला जाताना आरोपी हा पीडितेचा फोटो काढत होता. शिवाय काही दिवसापूर्वी पीडितेने साडी घातल्यानंतर तिचे फोटो काढले. शिवाय तिच्या कपड्याला हात लावून तुझ्या कपड्याला इस्त्री केली नाही का असे म्हणाला. 

ही बाब पीडितेने तिच्या पित्याला सांगितली. याप्रकरणी आरोपी नरेंद्र बोधले याच्यावर पोक्सो अंतर्गत व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: A young man has been booked for stalking a 5th grade girl and taking a picture