प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या, एक महिन्यानंतर गुन्हा उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 13:12 IST2024-01-17T12:57:35+5:302024-01-17T13:12:39+5:30
कळंबोली येथून वैष्णवी बाबर (१९) ही १२ डिसेंबरपासून बेपत्ता होती. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी नोंद केली.

प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या, एक महिन्यानंतर गुन्हा उघड
नवी मुंबई : प्रेयसीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना एक महिन्यानंतर उघडकीस आली असून, गुन्हे शाखेच्या पथकांनी पाच दिवस खारघर टेकडीत शोधमोहीम राबवून तरुणीचा छिन्न विछिन्न मृतदेह दरीतून बाहेर काढला.
कळंबोली येथून वैष्णवी बाबर (१९) ही १२ डिसेंबरपासून बेपत्ता होती. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी नोंद केली. तिचा शोध लागत नसल्याने प्रकरण गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता वैष्णवी एका तरुणासोबत खारघरमध्ये दिसली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तरुणाचा शोध घेतला असता त्याने १२ डिसेंबर रोजी खारघर स्थानकालगत रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले.
तपासादरम्यान गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती तरुणाचा मोबाईल लागला. त्यामुळे वैष्णवी व त्याचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. खारघर टेकडी परिसरात तिला घेऊन गेल्यामुळे तिच्यासोबत विपरीत काही घडले असावे, असा अंदाज व्यक्त करून तिचा मृतदेह शोधून काढला.