शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत गटारात आढळला, पोलीस तपास सुरू

By नितीन पंडित | Updated: July 27, 2022 20:37 IST

Murder Case : भिवंडीत अज्ञात महिलेची हत्या

नितिन पंडीतभिवंडी - वळपाडा येथे एका ३० ते ३५ वर्षीय अनोखाळ्या महिलेचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळूलेल्या अवस्थेत मंगळवारी गटारात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वळपाडा हद्दीतील पारसनाथ कंपाऊंडमधील एका मोठ्या गटारात हा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.          

वळपाडा हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड मधील दोन इमारतीच्या गोदामामध्ये मोठे गटार आहे. या गटारीच्या बाजूला मंगळवारी गावातील एका प्लंबरला महिलेचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळूलेल्या अवस्थेत दिसला होता. त्याने या घटनेची माहिती वळपाडा गावच्या पोलीस पाटील सुनंदा पाटील यांना दिली. पोलीस पाटील यांनी नारपोली पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.या हत्ये प्रकरणी बुधवारी पहाटे पोलीस पाटील यांच्या फिर्यादिवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) राजेश वाघमारे करीत आहेत.           

या महिलेची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच महिलेची ओळख पटणार असून मयत महिलेची ओळख पटल्यास लवकरात लवकर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येतील त्यासंदर्भातील तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसbhiwandiभिवंडी