डोंगरात दगडाने ठेचून महिलेचा खून; गळाही दाबला, आरोपी पसार

By संजय पाटील | Updated: March 8, 2023 10:59 IST2023-03-08T10:59:10+5:302023-03-08T10:59:28+5:30

वनवासमाचीतील घटना : सहाय्यक पोलीस निरिक्षक राहूल वरोटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून संशयिताचा शोध सुरू केला आहे. 

A woman was killed by being crushed by a stone in the mountains crime news in karad | डोंगरात दगडाने ठेचून महिलेचा खून; गळाही दाबला, आरोपी पसार

डोंगरात दगडाने ठेचून महिलेचा खून; गळाही दाबला, आरोपी पसार

कऱ्हाड : डोंगरात जळण आणायला गेलेल्या महिलेचा डोक्यात दगड घालून आणि गळा दाबून खून करण्यात आला. वनवासमाची, ता. कऱ्हाड येथे मंगळवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर खुनानंतर हल्लेखोर पसार झाला आहे. 

लता मधूकर चव्हाण (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक राहूल वरोटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून संशयिताचा शोध सुरू केला आहे. 

पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, वनवासमाची येथील लता चव्हाण या मंगळवारी दुपारी जळण आणायला गावाशेजारी डोंगरात गेल्या होत्या. त्यांची मुले शेणोली येथे अकलाईदेवी मंदीरात गेली होती. मुले घरी परत आल्यावर त्यांनी आईचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. दरम्यान गावातील काही लोकांनी लता यांना जळण आणायला जाताना पाहिले होते. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता रात्री उशिरा लता यांचा निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात लता यांचा गळा आवळून व दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. अत्यंत निर्घृण पद्धतीने लता यांचा खून केला असून संशयिताच्या शोधासाठी पोलिसांनी छपासत्र सुरू केले आहे.

Web Title: A woman was killed by being crushed by a stone in the mountains crime news in karad