महिलेने दिवसाढवळ्या गोळी झाडून केली पती अन् दिराची हत्या; धक्कादायक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 17:42 IST2024-01-01T17:39:17+5:302024-01-01T17:42:56+5:30

महिलेने संतापून थेट आपला पती आणि दिरावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या गोळीबारात महिलेच्या पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काही वेळाने दिराने प्राण सोडले.

A woman shot and killed her husband shocking reason | महिलेने दिवसाढवळ्या गोळी झाडून केली पती अन् दिराची हत्या; धक्कादायक कारण समोर

महिलेने दिवसाढवळ्या गोळी झाडून केली पती अन् दिराची हत्या; धक्कादायक कारण समोर

Murder Case ( Marathi News ) : गावठी कट्ट्याने गोळीबार करत महिलेने पती आणि दिराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उज्जैन शहरात घडली आहे. या हत्याकांडानंतर हातात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून या हत्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद संपत नसल्याने आंगणवाडी सेविका असलेल्या महिलेने संतापून थेट आपला पती आणि दिरावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या गोळीबारात महिलेच्या पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काही वेळाने दिराने प्राण सोडले.

नेमका काय वाद सुरू होता?

गोळीबार केलेल्या महिलेच्या कुटुंबातील काही सामूहिक जमीन तिच्या दिराकडे होती. ही जमीन आपल्याला मिळावी, यासाठी सदर महिलेचे प्रयत्न सुरू होते. मात्र दीर ती जमीन द्यायला तयार नव्हता आणि तिचा पती जमीन मिळवण्यासाठी फारसा पुढाकार घेत नव्हता. त्यामुळे वैतागलेल्या महिनेने आधी पतीवर गोळी झाडली. या गोळीबाराचा आवाज ऐकून तिथं आलेल्या दिरावरही नंतर तिने गोळी झाडली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पती आणि दिराचा खून केल्यानंतर महिला गावठी कट्ट्यासह थेट पोलीस ठाण्यात गेली आणि तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
 

Web Title: A woman shot and killed her husband shocking reason