महिलेचा कारनामा! १-२ नव्हे तर तब्बल ८ पुरुषांना जाळ्यात ओढलं, नवव्याचा शोध सुरू होता, त्याआधीच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:10 IST2025-08-05T11:10:26+5:302025-08-05T11:10:51+5:30
मागील १५ वर्षापासून ती अशी फसवणूक करत आहे. ती एका संघटित टोळीचा भाग असावी, त्यातून तिने हा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे.

महिलेचा कारनामा! १-२ नव्हे तर तब्बल ८ पुरुषांना जाळ्यात ओढलं, नवव्याचा शोध सुरू होता, त्याआधीच...
नागपूर - शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका महिलेने एक-दोन नव्हे तर तब्बल ८ विवाहित पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांची फसवणूक करून लग्न केले त्यानंतर ब्लॅकमेल करत कोट्यवधी लाटले. ही महिला नवव्या पतीच्या शोधात होती, मात्र त्याआधीच पोलिसांनी तिला अटक केली आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
स्वत:ला घटस्फोटीत दाखवायची महिला
या महिलेची ओळख समीरा फातिमा म्हणून झाली असून ती एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती विवाहित पुरुषांना टार्गेट करायची. त्यांच्याशी ओळख वाढवून सहानुभूती मिळवायची. मला आधार द्या, मी दुसरी पत्नी म्हणून राहीन असं ती म्हणायची. तिच्या या बहाण्याला अनेक पुरुष बळी पडले. ती त्यांना लग्नाचे आमिष दाखवून लग्न करायची. त्यानंतर एक महिन्यात काही ना काही कारण शोधून भांडण करायची आणि त्यांना ब्लॅकमेल करून पैसे लुबाडायची. मागील १५ वर्षापासून ती अशी फसवणूक करत आहे. ती एका संघटित टोळीचा भाग असावी, त्यातून तिने हा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे.
कोट्यवधीची लूट, बनावट प्रेग्नेंसीचं नाटक
सुरुवातीच्या पुराव्यानुसार, समीरा फातिमाने एका पीडित व्यक्तीकडून ५० लाख रूपये आणि दुसऱ्याकडून १५ लाख रुपये घेतले होते. लग्नानंतर ती पतीला विविध बहाणे करून त्यांना ब्लॅकमेल करत पैसे घ्यायची. धक्कादायक म्हणजे जेव्हा पोलीस या महिलेला पकडायला पोहचायची तेव्हा ती खोट्या प्रेग्नेंसीचं नाटक करून वाचण्याचा प्रयत्न करत होती.
दरम्यान, पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर २९ जुलैला नागपूरच्या एका चहाच्या दुकानावर तिला अटक करण्यात आली. नागपूर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या दीड वर्षापासून तिचा शोध पोलीस घेत होते. समीराच्या या त्रासाला कंटाळून अनेकांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली होती. अनेकांकडून तिने कोट्यवधीची रक्कम घेतली आहे. काहींनी तिला दागिने, रोकड, फ्लॅटही दिले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.