महिलेचा कारनामा! ५० लाखाचं सोनं नको त्या जागी लपवून देशात आणलं, पण एअरपोर्टवर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:18 IST2024-12-18T13:17:07+5:302024-12-18T13:18:15+5:30
ही महिला महाराष्ट्रातील रहिवासी आहे. ती एअर इंडियाच्या २१५६ या फ्लाईटने काठमांडूहून दिल्लीला आली होती.

महिलेचा कारनामा! ५० लाखाचं सोनं नको त्या जागी लपवून देशात आणलं, पण एअरपोर्टवर..
नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश केला आहे. आरोपी महिलेने ५० लाख रुपये किंमतीचे सोने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून देशात आणले होते परंतु एअरपोर्टवर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक करून जेलमध्ये पाठवले.
दिल्ली कस्टम विभागानुसार, आरोपी महिलेचे वय ४४ वर्ष आहे. रविवारी ही महिला नेपाळच्या काठमांडूहून दिल्लीत आली होती. एअरपोर्टवर या महिलेला तपासणीसाठी रोखण्यात आले. या महिलेच्या सामानाची आणि तिच्या शरीराची तपासणी केली असता ३ अंडाकार आकाराच्या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. ज्यात पेस्टच्या रुपात सोने असण्याची शक्यता आहे. या ३ कॅप्सूलचे एकूण वजन ७७० ग्रॅम होते. तपासात तिन्ही कॅप्सूलमध्ये हिरवा रंग आणि पॅकिंग लपवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारदर्शी टेपचा समावेश होता. या महिला प्रवाशाने स्वत: त्यांच्या प्रायव्हेट पार्टमधून ते बाहेर काढले.
महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलमधून सोन्याची ६८१ ग्रॅम पेस्ट ज्याचं वजन ५०.०३ लाख इतके आहे ते सापडले आहे. रासायनिक पेस्टच्या माध्यमातून ही महिला सोने दुबईहून बँकॉक, त्यानंतर नेपाळवरून भारतात आली. जेव्हा एअरपोर्टवरील अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला तेव्हा तिची तपासणी करण्यात आली. त्यात हा प्रकार उघडकीस आला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही महिला तिची बॅग घेऊन तपासणीच्या इथं पोहचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील हावभाव संशयास्पद होते. जेव्हा महिला अधिकाऱ्यांची नजर तिच्यावर पडली तेव्हा तिचे डोळे पाहून संशय वाढला. त्यानंतर महिलेला एआययू रुममध्ये नेण्यात आले. तिथे या महिलेच्या तपासणीत ३ कॅप्सूल आढळून आल्या.
दरम्यान, कस्टमने तिच्याकडून सोने जप्त केल्यानंतर या महिलेवर गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली आहे. ही महिला महाराष्ट्रातील रहिवासी आहे. ती एअर इंडियाच्या २१५६ या फ्लाईटने काठमांडूहून दिल्लीला आली होती. बेकायदेशीरपणे सोने भारतात आणून ती तस्करी करणार होती. मात्र एअरपोर्टवर तपासणीवेळी तिचा खरा चेहरा उघड झाला.