भाईंदरमध्ये सुट्टी मिळाली नाही म्हणून डीमार्टमधील कर्मचाऱ्याने लावली आग
By धीरज परब | Updated: July 15, 2023 16:13 IST2023-07-15T16:11:20+5:302023-07-15T16:13:16+5:30
भाईंदरच्या मुबारक कॉम्प्लेक्समध्ये राहणारी मेहेक अग्रवाल ( २३ ) ही मे २०२२ पासून डीमार्टमध्ये सेल्स असोसिएट्स म्हणून कामाला आहे.

भाईंदरमध्ये सुट्टी मिळाली नाही म्हणून डीमार्टमधील कर्मचाऱ्याने लावली आग
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या डीमार्ट मधील एका महिला कर्मचाऱ्याने सुट्टी मिळाली नाही व शिफ्ट बदली करून दिली नाही याचा राग येऊन डीमार्टमधील सामानाला आग लावून नुकसान केले म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
भाईंदरच्या मुबारक कॉम्प्लेक्समध्ये राहणारी मेहेक अग्रवाल ( २३ ) ही मे २०२२ पासून डीमार्टमध्ये सेल्स असोसिएट्स म्हणून कामाला आहे. १३ जुलै रोजी दुसऱ्या मजल्या वरील ब्लॅंकेट, उशी कव्हरच्या बॉक्सला आग लागली म्हणून ती विझवण्यात आली. सीसीटीव्ही मध्ये मेहेक ही त्यावेळी दिसून आल्याने तिच्याकडे डीमार्टच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता सुट्टी मिळाली नाही व शिफ्ट बदली करून दिली नाही याचा राग येऊन आग लावल्याचे सांगितले. सहायक व्यवस्थापक विनोद लाड यांच्या फिर्यादीवरून मेहेकवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.