शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

रहस्य! UPSC तयारी करणारा बनला खूनी; ७५ दिवसांचा रक्तरंजित कट अखेर उघड झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:46 IST

सतीशच्या कारमधून मिळालेला जीपीएस लोकेशन ट्रेस केले असता त्याचे लॉगिन सतीशची पत्नी भावना हिचा भाऊ देवेंद्रच्या मोबाईल फोनशी कनेक्ट दाखवले

लखनौ - उत्तर प्रदेशातील पोलीस निरिक्षकाची त्याच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा एक व्यक्ती हुडी घालून सायकलवरून घराबाहेरील रस्त्यावर फिरत होता. परंतु त्याचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला नाही. परंतु त्याचवेळी पोलीस निरिक्षकाच्या कारमधून एक जीपीएस डिवाइस जप्त करण्यात येते आणि त्यातून असा खुलासा उघड होतो जे ऐकून प्रत्येकजण हैराण होतो. 

७५ दिवस रक्तरंजित कटसुमारे ७५ दिवसांपासून रक्तरंजित कट रचला जात होता आणि त्याचे लक्ष्य होते यूपी पोलीस दलातील एक निरीक्षक.पोलीस तपासादरम्यान इन्स्पेक्टरच्या गाडीत एक गुप्त जीपीएस सापडला. तपास पुढे सरकल्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून हत्यारांची खरेदी उघडकीस आली आणि त्यानंतर दिवाळीच्या रात्री फटाक्यांच्या आवाजात गोळीबार झाला पण गोळ्यांचा आवाज कुठेतरी हरवला आणि खूनी आपल्या हेतूत यशस्वी झाला होता.

एक परफेक्ट मर्डरहा जवळपास एक परफेक्ट मर्डर होता. हा गुन्हा सोडवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होते. परंतु गुन्हेगाराच्या एका चुकीनं केवळ ६ दिवसांत हत्येचा उलगडा झाला नाही तर या हत्येमागचा खरा सूत्रधार कोण हेदेखील समोर आले. या घटनेची सुरुवात होते दिवाळीच्या त्या रात्रीपासून...लखनौच्या मानस नगर भागात राहणाऱ्या पोलीस निरिक्षक सतीश कुमार सिंह त्यांची पत्नी भावना, दहा वर्षाच्या मुलीसह राजाजीपुरम इथं नातेवाईकांच्या घरी दिवाळी साजरी करत होते. परंतु त्या रात्री भावनाची तब्येत बिघडल्याने पोलीस निरीक्षक सतीश कुमार हे कुटुंबासह पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले. 

१२-१३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ च्या सुमारास ते मानस नगर येथील घराबाहेर पोहचले. तिथे गाडीतून खाली उतरून सतीश कुमार हे घरचा गेट उघडत होते तेव्हा अचानक एका पाठोपाठ एक गोळ्यांचा आवाज येतो. निरिक्षक सतीश रक्ताच्या थारोळ्यात घराच्या उंबरठ्यावर पडलेले असतात.हा आवाज ऐकून भावना गाडीबाहेर डोकावते तेव्हा पती सतीश कुमार जमिनीवर पडलेले दिसतात. या घटनेत सतीश कुमार यांचा मृत्यू झालेला असतो. एका पोलीस निरिक्षकाची हत्या झाल्याने पोलीस दलात खळबळ उडते. ही हत्या कुणी केली असावी यासारखे अनेक प्रश्न उभे राहतात. या तपासासाठी पथके नेमली जातात. घराच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जातात. अनेकांना चौकशीसाठी बोलावले जाते. 

या तपासावेळी पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागते. स्वत: पोलीस निरिक्षकाच्या पत्नीने हा दावा केलेला असतो. भावना म्हणते की, सतीश खूप अय्याश माणूस होता. विवाहित आणि मुली असूनही तो केवळ अफेअर ठेवत नसे तर अनेकदा आम्ही घरात असतानाही अन्य मुलींना घेऊन येत होता. एकदा तर सतीशच्या १० वर्षाच्या मुलीने वडिलांना नको त्या अवस्थेत पाहिले होते. मृत पोलीस निरिक्षकाचे अनेक मुलींसोबत संबंध होते असं तपासात कळाल्यानंतर आणखी एक गोष्ट समोर आली. सतीश काही तांत्रिकाच्या संपर्कात होता. तंत्राद्वारे तो अविवाहित मुलींसोबत संबंध ठेवायचा. सतीशला खजिन्यासाठी अशा मुलीचा शोध होता की जिच्या शरीरावर कुठलाही दाग नको. पोलिसांसमोर तपासात येणाऱ्या बाबीने वेगवेगळ्या अँगलने विचार करण्यास भाग पाडले. 

सतीशच्या कारमधून मिळालेला जीपीएस लोकेशन ट्रेस केले असता त्याचे लॉगिन सतीशची पत्नी भावना हिचा भाऊ देवेंद्रच्या मोबाईल फोनशी कनेक्ट दाखवले. सतीशच्या कारमध्ये जीपीएस लावणारा हा देवेंद्रच होता जो सतीशच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन होता. सतीशच्या घराबाहेर हुडी घालून फिरणाऱ्या व्यक्ती आणि देवेंद्र यांच्यात अनेक साम्य होते. त्यामुळे सतीशची हत्या करणारा त्याचाच मेव्हणा नाही ना असा संशय पोलिसांना आला. तपासात देवेंद्रचे नाव आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सुरुवातीच्या चौकशीत त्याने दिशाभूल करणारी उत्तरे दिली. त्यानंतर जेव्हा पुरावे समोर आणले तेव्हा गुन्हा कबुल केल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. परंतु कहानी इथेच संपली नाही तर सतीशच्या हत्येत त्याची पत्नी भावनाही सहभागी होती जी तिच्या पतीच्या स्वभावामुळे वैतागली होती. 

भाऊ-बहिणीनं मिळून रचला कट पोलीस निरिक्षक सतीश आणि भावना यांच्या लग्नाला १० वर्ष झाले होते. परंतु १० वर्षात सतीशचे अनेक मुलींसोबत विवाहबाह्य संबंध होते. ज्यावरून सतत या दोघांमध्ये वाद व्हायचा. बहिणीचा त्रास पाहून देवेंद्रही रागात होता. त्यानंतर देवेंद्र आणि भावना या दोघांनी मिळून सतीशला कायमचा संपवायचा असं डोक्यात घेतले. त्यानंतर जवळपास अडीच महिने दोघे सतीशची हत्या करण्याचे प्लॅनिंग रचत होते. अखेर दिवाळीच्या रात्री फटाक्यांच्या आवाजात गोळीचा आवाज दडपला जाईल तेव्हा या दोघांनी सतीशची हत्या केली. या प्रकरणी आरोपी देवेंद्र हा इंजिनिअर आहे, तो ४ वर्ष बँकेत नोकरी करत होता. त्यानंतर सध्या तो यूपीएससीची तयारी करत होता. परंतु त्याआधीच हत्येच्या गुन्ह्यात तो अडकला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी