सोसायटीच्या दादरातच चोरट्याने हिसकावली महिलेची सोनसाखळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2022 20:43 IST2022-12-25T20:32:26+5:302022-12-25T20:43:25+5:30
मुंबईच्या साकीनाका भागात राहणारी ही महिला ठाण्यातील आपल्या बहिणीकडे काही कामानिमित्त आली होती.

सोसायटीच्या दादरातच चोरट्याने हिसकावली महिलेची सोनसाखळी!
ठाणे: लोकमान्यनगर पाडा क्रमांक एक येथील एका सोसायटीतील जिन्याने घराकडे जाणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला गाठून एका चोरट्याने तिच्या गळ्यातील दीड लाखांच्या दोन सोनसाखळया जबरीने चोरल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी रविवारी दिली.
मुंबईच्या साकीनाका भागात राहणारी ही महिला ठाण्यातील आपल्या बहिणीकडे काही कामानिमित्त आली होती. २३ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास जेवण केल्यानंतर ती लोकमान्यनगर पाडा क्रमांक एक येथील महेश्वरी अपार्टमेंटमधील आपल्या बहिणीच्या घराकडे जात होती.
त्याच वेळी या सोसायटीचा जिना चढत असतांना एका चोरट्याने तिच्या गळ्यातील दीड लाखांच्या दोन सोनसाखळ्या जबरीने खेचून रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारसायकस्वाराच्या मागे बसून पोबारा केला. याप्रकरणी तिने दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध २४ डिसेंबर रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढोले हे करीत आहेत.