स्पा सेंटरवर अचानक पडली धाड, मजास करवून घेणाऱ्यांची तारांबळ, कपडे तिथेच टाकून पळाले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:41 IST2022-05-20T16:41:05+5:302022-05-20T16:41:39+5:30
Crime News: उत्तराखंडमधील अशाच एका स्पा सेंटरवर पडलेल्या धाडीनंतर मसाज करवून घेणाऱ्यांची पळापळ उडाल्याचा आणि स्पा सेंटरमध्ये आलेले लोक कपडे तिथेच टाकून पळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

स्पा सेंटरवर अचानक पडली धाड, मजास करवून घेणाऱ्यांची तारांबळ, कपडे तिथेच टाकून पळाले लोक
देहराडून - गेल्या काही दिवसांमध्ये अवैध स्पा सेंटर्सचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. दरम्यान उत्तराखंडमधील अशाच एका स्पा सेंटरवर पडलेल्या धाडीनंतर मसाज करवून घेणाऱ्यांची पळापळ उडाल्याचा आणि स्पा सेंटरमध्ये आलेले लोक कपडे तिथेच टाकून पळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
उत्तराखंडमधील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कुसूम कंडवाल यांनी नैनीताल रोडवरील तीन स्पा सेंटरवर छापा मारला. तेव्हा तिथे विविध प्रकारची अनियमितता आढळली. तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांचे आणि काम करणाऱ्यांचे कुठलेही रेकॉर्ड नव्हते. त्याचदरम्यान, छापा मारला तेव्हा स्पा सेंटरमध्ये मसाज करवून घेणारे अनेक पुरुष आणि मसाज करवून देणाऱ्या महिला संधी पाहून फरार झाल्या. अनेक पुरुष तर आपले कपडे तिथेच टाकून पळून गेले.
दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा कुसूम कंडवाल यांनी याबाबत त्यांनी सक्त आदेश दिले आहेत. महिलांची मसाज महिला आणि पुरुषांची मसाज पुरुषांनी करावी अन्यथा तो वेश्याव्यवसाय समजला जाईल, असे त्यांनी म्हटले होते. तसेच नियमभंग करणाऱ्या स्पा सेंटर्सवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले होते.