आश्रमात अल्पवयीन मुलीवर साधूचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 06:52 IST2023-06-21T06:52:39+5:302023-06-21T06:52:50+5:30

२०१६ पासून आश्रमात वास्तव्यास असलेली पीडित मुलगी मागील काही दिवसांपासून बेपत्ता होती.

A sadhu rapes a minor girl in an ashram, visakhapatnam | आश्रमात अल्पवयीन मुलीवर साधूचा बलात्कार

आश्रमात अल्पवयीन मुलीवर साधूचा बलात्कार

विशाखापट्टणम : येथील एका आश्रमात अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या साधूला पोलिसांनी अटक केली. स्वामी पूर्णानंद (६४) असे या साधूचे नाव असून, तो अविवाहित आहे. विशेष म्हणजे तो उच्चविद्याविभूषित असल्याचेही पुढे आले.

२०१६ पासून आश्रमात वास्तव्यास असलेली पीडित मुलगी मागील काही दिवसांपासून बेपत्ता होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. परंतु पीडित मुलीने आज विशाखापट्टणमच्या पोलिस ठाण्यात येत तक्रार दाखल केली. पूर्णानंदने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वामी पूर्णानंद याला अटक केली.

२०१२ मध्येही त्याच्यावर अल्पवयीन मुलीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, पीडितेच्या आरोग्य तपासणीनंतर तिच्यावर बलात्कार झाला की नाही हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या आश्रमात सध्या १२ मुले वास्तव्यास असून, त्यापैकी चार मुली आहेत.

Web Title: A sadhu rapes a minor girl in an ashram, visakhapatnam