लग्नानंतर महिन्यात पत्नीचा खून, मृतदेहाचे कटरने केले तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 07:14 IST2022-12-19T07:12:25+5:302022-12-19T07:14:39+5:30

कटरने मृतदेहाचे अनेक तुकडे करून भटक्या कुत्र्यांसमोर टाकल्याची घडली क्रूर घटना.

A month after the marriage the wife was killed the body was cut into pieces with a cutter | लग्नानंतर महिन्यात पत्नीचा खून, मृतदेहाचे कटरने केले तुकडे

लग्नानंतर महिन्यात पत्नीचा खून, मृतदेहाचे कटरने केले तुकडे

रांची : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडापेक्षाही भयंकर घटना झारखंडमध्ये शनिवारी उघडकीस आली. साहिबगंज येथे एकाने पत्नीचा खून केला व कटरने मृतदेहाचे अनेक तुकडे करून भटक्या कुत्र्यांसमोर टाकले. महिनाभरापूर्वीच दोघांनी प्रेमविवाह केला होता. रुबिका पहाडीन (वय २२) असे महिलेचे नाव आहे. पाेलिसांनी पती दिलदार अन्सारीसह ८ नातेवाईकांना अटक केली आहे. 

रुबिका ही पहाडिया या आदिवासी समुदायाची होती. ती विवाहानंतर पती दिलदारसोबत  बेलटोला येथे राहत राहत होती. दिलदार याचा हा दुसरा विवाह होता. त्याची पहिली पत्नीही त्याच्यासोबत राहत होती. 

१८ तुकडे सापडले 

  • आतापर्यंत मृतदेहाचे १८ तुकडे सापडले आहेत. यासोबतच एक शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. रुबिकाच्या खुनासाठी दिलदारला त्याच्या कुटुंबीयांनी मदत केल्याचा संशय आहे. 
  • पोलीस दिलदारचे वडील मो. मुस्तकीम अंसारी, आई मरियम खातून, पत्नी गुलेरा, भाऊ अमीर यांची चौकशी करत आहेत.
     

पोलिसांनी लावून दिले होते लग्न 
रुबिका आणि दिलदार यांचे खूप दिवसांपासून अफेअर होते; पण दोघांचेही कुटुंब लग्नासाठी तयार नव्हते. महिनाभरापूर्वी दोघांनी घरातून पळून जात पोलिस ठाणे गाठले असता पोलिसांनी दोघांचे लग्न लावून दिले होते. लग्नानंतर काही दिवसांतच कुटुंबात भांडणे होऊ लागली. त्यामुळे दिलदारने रुबिकाला संपविण्याचा कट रचला. 

Web Title: A month after the marriage the wife was killed the body was cut into pieces with a cutter