चाकूच्या धाकात अल्पवयीन मुलावर चार वर्षे अत्याचार; मुंबईतील धक्कादायक प्रकार

By मनीषा म्हात्रे | Updated: February 15, 2024 11:09 IST2024-02-15T11:09:25+5:302024-02-15T11:09:36+5:30

मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

A minor was tortured at knifepoint for four years; Shocking types in Mumbai | चाकूच्या धाकात अल्पवयीन मुलावर चार वर्षे अत्याचार; मुंबईतील धक्कादायक प्रकार

चाकूच्या धाकात अल्पवयीन मुलावर चार वर्षे अत्याचार; मुंबईतील धक्कादायक प्रकार

मुंबई : चाकूच्या धाकात ५९ वर्षीय आरोपीने १४ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार जोगेश्वरीमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात अनैर्सगिक अत्याचार सह पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवत रात्री उशिराने आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, ०१ जानेवारी २०१९ ते ६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हे अत्याचार सुरू होते. आरोपी विरुद्ध यापूर्वी देखील दोन गुन्हे नोंद आहे. यामध्ये विनयभंग सह मारहाण सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपीने मुलगा घरात एकटा राहत असल्याचा फायदा घेत त्याला चाकूच्या धाकात जिवेठार मारण्याची धमकी वारंवार लैंगिक अत्याचार केले. आरोपीचे अत्याचार वाढल्याने मुलाने बुधवारी रात्री पोलिसांत धाव घेत अत्याचाराला वाचा फोडली. पोलिसांनी रात्री गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. आरोपी आणि मुलगा एकाच परिसरात राहण्यास आहे. या घटनेने मुलगा मानसिक धक्क्यात आहे. 

Read in English

Web Title: A minor was tortured at knifepoint for four years; Shocking types in Mumbai