शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

लॉजमध्ये घुसून अल्पवयीन विद्यार्थ्याची चाकूने वार भोसकून हत्या, तीन जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 21:21 IST

A minor student was stabbed : पोलिसांनी मृताच्या खोलीतून चाकू आणि रक्ताने माखलेले कापड जप्त केले आहे.

पाटणा - बिहारची राजधानी पाटण्यात गुन्हेगार अजूनही निर्भय आहेत. त्यांना पोलिसांचा भय उरलेला नाही. येथील बहादूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामकृष्ण कॉलनीत असलेल्या माँ सरस्वती निवास नावाच्या लॉजमध्ये घुसून एका अल्पवयीन विद्यार्थ्याची अज्ञात गुन्हेगारांनी चाकूने वार करून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हा केल्यानंतर मारेकऱ्यांनी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. मृताच्या नातेवाईकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. एफएसएल टीमनेही घटनास्थळी पोहोचून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी मृताच्या खोलीतून चाकू आणि रक्ताने माखलेले कापड जप्त केले आहे.समस्तीपूर जिल्ह्यातील सिमराहा खानपूर येथील रहिवासी सुनील कुमार राय यांचा १७ वर्षीय मुलगा राहुल कुमार असे मृताचे नाव आहे. राहुल गेल्या एक वर्षापासून येथे राहून आयआयटी-जेईई स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्या कारणासाठी त्याची निर्घृण हत्या करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राहुलच्या कुटुंबीयांनीही त्याच्या हत्येमागील कारण सांगण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

या घटनेबाबत मृताचा चुलत भाऊ लव कुमार आणि त्याचे मामा सुजित कुमार यांनी सांगितले की, राहुलचा त्याच्या गावातील राहत्या घरातील आर्यनसोबत वाद होता. या वादामुळे त्याने आर्यनला खोली रिकामी करण्यास सांगितले. त्याने सांगितले की 31 मार्च रोजी आर्यनने खोली रिकामी केली होती आणि तीन दिवसांनंतर राहुलची लॉजमध्ये घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी राहुलच्या कुटुंबीयांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला आहे. या हत्येला दुजोरा देताना बहादूरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी रिझवान अहमद खान यांनी लवकरच संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहारArrestअटकDeathमृत्यूStudentविद्यार्थी