अल्पवयीन तरुणीचा इंस्टाग्रामने घात केला; गर्लफ्रेंड भांडल्याचे सांगत मित्राने बोलावले, दोन दिवस सामुहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 09:07 IST2023-04-28T08:58:34+5:302023-04-28T09:07:54+5:30

कोळसेवाडी येथिल पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा  दाखल झाला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

A minor girl was gang raped by Instagram friend, kolsewadi, thane Police arrest four people including a juvenile in Kalyan | अल्पवयीन तरुणीचा इंस्टाग्रामने घात केला; गर्लफ्रेंड भांडल्याचे सांगत मित्राने बोलावले, दोन दिवस सामुहिक बलात्कार

अल्पवयीन तरुणीचा इंस्टाग्रामने घात केला; गर्लफ्रेंड भांडल्याचे सांगत मित्राने बोलावले, दोन दिवस सामुहिक बलात्कार

कल्याण: कल्याणमध्ये राहणारी पंधरा वर्षांच्या मुलीवर इन्स्टाग्राममुळे मोठा प्रसंग ओढवला आहे. या अल्पवयीन मुलीवर चार जणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालकांनी मुलगी हरविल्याची तक्रार दिल्यामुळे तिची सुटका करण्यात आली.

कोळसेवाडी येथिल पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा  दाखल झाला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. घटना अशी की, ही अल्पवयीन मुलगी कल्याण मध्ये राहते. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने तिला  माझे प्रेयसी सोबत भांडण झाले आहे, तू सोडविण्यास ये, असे सांगत भेटण्यासाठी बोलावून घेतले. यानंतर तिला रुमवर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला.

या मुलीला तरुणाने दुसऱ्या दिवशी देखील रुमवर बोलावले. यावेळी त्याच्यावर त्याच्या तीन मित्रांनीही बलात्कार केला. पीडितेच्या घरच्यांना तिचा थांगपत्ता लागेना म्हणून पोलिसांकडे हरवल्याची तक्रार केली. कोळसेवाडी पोलिसांनी या अनुषंगाने तपास करत पीडित तरुणीची सुटका केली. चौकशी केली असता तिच्यावर अतिप्रसंग झाला असल्याचे समोर आले. 



 

यामुळे पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले. यात एका अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. साहिल राजभर , सुजल गवळी आणि विजय बेरा अशी तीन आरोपींची नावे आहेत. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे असे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय घोडे यांनी सांगितले. 

Web Title: A minor girl was gang raped by Instagram friend, kolsewadi, thane Police arrest four people including a juvenile in Kalyan