माहेरी आलेल्या विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By विजय पाटील | Updated: May 14, 2023 00:33 IST2023-05-14T00:33:12+5:302023-05-14T00:33:24+5:30
वसमत तालुक्यातील कानोसा येथील घटना

माहेरी आलेल्या विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
कुरुंदा : वसमत तालुक्यातील कानोसा येथे २७ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. ज्योती मारोती कबले असे मयत महिलेचे नाव असून ती कानोसा येथे माहेरी आली होती. गणपूर कामठा येथील ज्योती मारोती कबले ही विवाहित महिला वसमत तालुक्यातील कानोसा येथे आपल्या माहेरी आली होती. तिने वडिलांच्या शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. १३ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत ज्योती कबले हिला एक मुलगी आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच कुरुंदा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, जमादार तुकाराम आम्ले, बापूराव वाबळे, शिंदे यांनी कानोसा येथे भेट देऊन पंचनामा केला. महिलेच्या मृतदेहावर कुरुंदा येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.