फटाके वाजवू नका सांगितल्याने नाशिकमध्ये कोयत्याने वार करून एकाची हत्या

By संजय पाठक | Updated: November 15, 2023 09:54 IST2023-11-15T09:53:58+5:302023-11-15T09:54:36+5:30

या संदर्भात व्यक्तीच्या पत्नीने इंदिरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

A man was stabbed to death in Nashik for telling people not to burst firecrackers | फटाके वाजवू नका सांगितल्याने नाशिकमध्ये कोयत्याने वार करून एकाची हत्या

फटाके वाजवू नका सांगितल्याने नाशिकमध्ये कोयत्याने वार करून एकाची हत्या

- संजय शहाणे

नाशिक : फटाके वाजवू नका असे सांगितल्याचा राग आल्याने नाशिक शहरातील पाथर्डी परिसरात एका इसमाची दहा ते बारा जणांनी कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली. या संदर्भात व्यक्तीच्या पत्नीने इंदिरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाथर्डी फाटा येथील स्वराज्य नगर परिसरामध्ये गणेश शिंदे, नारायण शिंदे, त्यांचे वडील बबन शिंदे, तसेच बबन शिंदे यांची पत्नी आणि मुलगी दहा ते बारा जणांसोबत फटाके उडवत होते. त्यांचे शेजारी राहणाऱ्या गौरव आखाडे यांच्या घराकडे ते रॉकेट आणि अन्य फटाके उडवत असल्याने गौरव आखाडे यांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर गौरव यांनी मोबाइलमध्ये त्यांचे शूटिंग सुरू केले. 

यावेळी फटाके फोडणाऱ्यांनी आखाडे यांचा मोबाईल घेऊन पळ काढला. त्यामुळे आखाडे त्यांच्या मागे धावताच त्या दहा बारा जणांनी त्यांच्यावर कोयत्याने हाता-पायावर, पोटावर कोयत्याने वार केले. गौरव यांना त्यांच्या पत्नीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सपना आखाडे यांनी इंदिरा नगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Web Title: A man was stabbed to death in Nashik for telling people not to burst firecrackers